नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी पदभार स्विकारला

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी)  : वैजापूर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी सोमवारी (दि. २९)  अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी भागवत बिगोत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

याप्रसंगी नगरपालिकेच्या प्रांगणात मोठा शामियाना उभारण्यात आला होता. याप्रसंगी शहरातील नागरिक व राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी साबेर खान हाजी अखिल शेठ कल्याण गांगोडे विशाल संचेती उल्हास ठोंबरे, पंकज ठोंबरे, दशरथ बनकर, राजू सिंग राजपूत, विनोद राजपूत, प्रशांत कंगले इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदभार स्वीकारताच डॉ. दिनेश परदेसी यांनी सांगितले की वैजापूरचे लोकनेते स्वर्गीय आर. एम. वाणी यांच्या स्मारकासाठी तात्काळ प्रयत्न केले जाईल. शहरासाठी नवीन रुग्णालय उच्च क्षमतेचे पाणी फिल्टर नगरपालिकेच्या माध्यमिक शाळा दररोज घंटागाडी मार्फत कचरा संकलन इत्यादी कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील. निवडणुका संपल्या असून आता सर्वांना सोबत घेऊन वैजापूर शहराचा विकास करण्यात येईल.  याप्रसंगी भाजपचे ११ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ सदस्य, शिवसेना शिंदे गटाचे १० सदस्य यांनी आपला अधिकृत पदभार स्वीकारला.